Connect with us

News

RTE प्रवेशाची सोडत जाहीर – वंचित घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के जागांवर प्रवेश.

Published

on

RTE Admission Details : Admission to 25 percent seats in private schools. The release of RTE admissions was announced on Wednesday, April 7. Disadvantaged students are given admission in 25 percent seats in private schools through this draw.

RTE प्रवेशाची सोडत जाहीर – खासगी शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेश. आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी ७ एप्रिल रोजी जाहीर झाली. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या सोडतीमार्फत खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी आरटीई सोडत बुधवारी जाहीर झाली. येत्या १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.

Ads

आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होतील.

आरईटीई प्रवेश तपशील :

  • एकूण शाळा – ९,४३२
  • प्रवेशक्षमता – ९६,६८४
  • एकूण अर्ज – २,२२,०२८

सोडतीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणास्तव पालक बाहेरगावी असतील, तर त्यांनी समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधावा. प्रवेश मिळूनही संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे.

Ads Below The Content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending